तिला पाहता असे वाटले
वसंतात ही बहरली फ़ुले...
निळे सावळे मेघ तसे तिचे डोळे भासले
आभाळासारखी तिच्या गालांची रंगसंगती
घन रात्रीचे काजळ जणू केसात गुंतले
तिला पाहता असे वाटले........
गंध फ़ुलांचा असावा असा दरवळे तिचा श्वास
वार्यापरी चहुकडे तिचाच पसरे भास
झुळझुळणारा झरा तसे तिचे पैजण छनछनले
तिला पाहता असे वाटले.........
चंद्राचे तेज गोंदले तिने जसे कपाळी अन
तिच्या गालावरी खळी जशी वेलीवरचीच कळी
रंग फ़ुलांचे तिच्या ओठावरी रंगले
तिला पाहता असे वाटले........
रविवार 5 फेब्रुवारी 2012
तिला पाहता असे वाटले
द्वारा पोस्ट केलेले केदार भोपे येथे 1-17 am
Subscribe to:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा