कधी मी उशाशी तुझे स्वप्न घेतो पुन्हा काळजाला नवे घाव देतो... पुन्हा चाळतो काही अव्यक्त पत्रे पुन्हा मग नव्याने नवे भाव लिहितो.... ...
कधी मी उशाशी तुझे स्वप्न घेतो
पुन्हा काळजाला नवे घाव देतो...
पुन्हा चाळतो काही अव्यक्त पत्रे
पुन्हा मग नव्याने नवे भाव लिहितो....
कधी मग अचानक कुठे दूर जातो
तुझ्या चार स्मृती त्या बांधून नेतो....
असा चिंब होतो तुझ्या त्या स्मृतिनी
पुन्हा आसवांचा तो पाऊस येतो.....
कधी तू दिसावी असा भास होतो
पुन्हा ओळखीचा तो आवाज येतो....
मना आस दिसशील पुन्हा सांजवेळी
आता रोज सूर्यास विझवून जातो....
आता भेटणारा तो प्रत्येक म्हणतो
कसा कोण होता कसा आज दिसतो....
मला मीच पाहून जमाना गुजरला
असा रोज जगतो जसा रोज मरतो....
कधी मी उशाशी तुझे स्वप्न घेतो
पुन्हा काळजाला नवे घाव देतो......
Sanjay Throat,
9833158108