वेडी मुलगी कविता वेडी मुलगी आहे वेळ नाही म्हटले तरी येते मोहिनी घालते भावनांची मनासारखे करवूनच घेते गळ्यामध्ये हात घालते कानामध्ये ती कुज...
वेडी मुलगी
कविता वेडी मुलगी आहे
वेळ नाही म्हटले तरी येते
मोहिनी घालते भावनांची
मनासारखे करवूनच घेते
गळ्यामध्ये हात घालते
कानामध्ये ती कुजबुजते
शब्दांची मग फुले माळते
अर्थ शिंपडून नाचत सुटते
डोळे वटारताच रूसून बसते
कट्टी करते लपून बसते
वेडेपणाचे आमिष देताच
पटकन पुन्हा कुशीत घुसते
कविता वेडी मुलगी आहे
लळा लावते वेडे करते
हट्ट करते छळते तरीही
जगणे आनंदाने भरते
तुषार जोशी, नागपूर
२८ जानेवारी २०१०
कविता वेडी मुलगी आहे
वेळ नाही म्हटले तरी येते
मोहिनी घालते भावनांची
मनासारखे करवूनच घेते
गळ्यामध्ये हात घालते
कानामध्ये ती कुजबुजते
शब्दांची मग फुले माळते
अर्थ शिंपडून नाचत सुटते
डोळे वटारताच रूसून बसते
कट्टी करते लपून बसते
वेडेपणाचे आमिष देताच
पटकन पुन्हा कुशीत घुसते
कविता वेडी मुलगी आहे
लळा लावते वेडे करते
हट्ट करते छळते तरीही
जगणे आनंदाने भरते
तुषार जोशी, नागपूर
२८ जानेवारी २०१०