सखे तुझ्यात हे बंध आले जुळून असे या फुलात गंध हळवे आले दरवळून असे झोंबतो हा गारवा ह्या तनुस शहारून दारात सोनियाचे किरण आले उजळून असे कायेत...
सखे तुझ्यात हे बंध आले जुळून असे
या फुलात गंध हळवे आले दरवळून असे
झोंबतो हा गारवा ह्या तनुस शहारून
दारात सोनियाचे किरण आले उजळून असे
कायेत ह्या सखे लावण्य सजले तुझे
मी तुझाच राणी नकोस पाहू छळून असे
हा लटकाच तोरा तुझा मज भुरळ घालून जातो
स्पर्शून कायेस मग माझिया स्पंदने भाळून आले
मम भास होतो सखे मिठीत तुझिया जरासा
ह्या स्वर्गीचेच सुख मज आले मिळून असे
मी सलाम ठोकतो रुपास तुझिया आता
सखे झालो गुलाम तुझा मज आले कळून असे
या फुलात गंध हळवे आले दरवळून असे
झोंबतो हा गारवा ह्या तनुस शहारून
दारात सोनियाचे किरण आले उजळून असे
कायेत ह्या सखे लावण्य सजले तुझे
मी तुझाच राणी नकोस पाहू छळून असे
हा लटकाच तोरा तुझा मज भुरळ घालून जातो
स्पर्शून कायेस मग माझिया स्पंदने भाळून आले
मम भास होतो सखे मिठीत तुझिया जरासा
ह्या स्वर्गीचेच सुख मज आले मिळून असे
मी सलाम ठोकतो रुपास तुझिया आता
सखे झालो गुलाम तुझा मज आले कळून असे