प्रेम करतोस ना तिच्यावर, मग कर फक्त प्रेमाचा वर्षाव, तिनेही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव..... असेल तिचा नकार, तर तोही तू हसत स्वीकार...
प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फक्त प्रेमाचा वर्षाव,
तिनेही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव.....
असेल तिचा नकार, तर
तोही तू हसत स्वीकार,
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार.....
नाही म्हणाली तर तुझ्या
प्रेमाने नकाराला होकाराने बदल,
का नाही म्हणाली याचा विचार
करून आधी स्वत:ला बदल..
नाही म्हणाली तर तिच्या
नकारावर हि प्रेम करावं,
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवावं.....
नको रे घेवूस तुझ्या वेड्या
हट्टापायी तिचा बळी,
काय मिळणार तुला तोडून
एखादी उमलणारी कळी..
खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची नीती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जीवाची भीती..
तुझे हे सच्चे रूप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार,
तिला हि होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार.....
अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तू हि घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार.....
मग कर फक्त प्रेमाचा वर्षाव,
तिनेही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव.....
असेल तिचा नकार, तर
तोही तू हसत स्वीकार,
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार.....
नाही म्हणाली तर तुझ्या
प्रेमाने नकाराला होकाराने बदल,
का नाही म्हणाली याचा विचार
करून आधी स्वत:ला बदल..
नाही म्हणाली तर तिच्या
नकारावर हि प्रेम करावं,
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवावं.....
नको रे घेवूस तुझ्या वेड्या
हट्टापायी तिचा बळी,
काय मिळणार तुला तोडून
एखादी उमलणारी कळी..
खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची नीती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जीवाची भीती..
तुझे हे सच्चे रूप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार,
तिला हि होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार.....
अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तू हि घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार.....