पुढे पाऊली गर्भ दाटे मनीचा फुटे बांध बघता सौदामिनीचा बरे काळ सरला विरह वागलाही घट फोडिले तू येऊन आता उशीचा भिजला कापूस होता भेट सावलीला भा...
पुढे पाऊली गर्भ दाटे मनीचा
फुटे बांध बघता सौदामिनीचा
बरे काळ सरला विरह वागलाही
घट फोडिले तू येऊन आता
उशीचा भिजला कापूस होता
भेट सावलीला भास्कराची न होती
तम पांघरून झडले बोच नव्हते
बरे आज नभाने उजवले खोपटे ते
झुळूकेत तुटली कोळीष्टके ती
तुषारव आणिली तू यौवनाचे
दिशाहीन अंतराळ ढेपाळला तो
उघडले दार तू आणून नौका
शिलालेख वळला सकारात आळ
अंगणात भेटतील फुलांचे प्रहार
असे एकदाचे जुने जाच झाले
तुला पाहता सर्व काही मिळाले
फुटे बांध बघता सौदामिनीचा
बरे काळ सरला विरह वागलाही
घट फोडिले तू येऊन आता
उशीचा भिजला कापूस होता
भेट सावलीला भास्कराची न होती
तम पांघरून झडले बोच नव्हते
बरे आज नभाने उजवले खोपटे ते
झुळूकेत तुटली कोळीष्टके ती
तुषारव आणिली तू यौवनाचे
दिशाहीन अंतराळ ढेपाळला तो
उघडले दार तू आणून नौका
शिलालेख वळला सकारात आळ
अंगणात भेटतील फुलांचे प्रहार
असे एकदाचे जुने जाच झाले
तुला पाहता सर्व काही मिळाले