गर्दीत हरवलेला मी.. स्वतःची ओळख शोधत राहतो, तुला धुंडाळत राहतो, कदाचित या गर्दीतला एक चेहरा तू असशील.. या गर्दीत सारेच अनोळखी.. जगरहाटीप्रमा...
गर्दीत हरवलेला मी..
स्वतःची ओळख शोधत राहतो,
तुला धुंडाळत राहतो,
कदाचित या गर्दीतला एक चेहरा तू असशील..
या गर्दीत सारेच अनोळखी..
जगरहाटीप्रमाणे वाहत जाणारे,
मी प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत राहतो..
तुला शोधताना..
तू यावं माझ्या आयुष्यात..
माझं अस्तित्व बनून,
या गर्दीत माझ्यासाठी कुणीतरी थांबेल..
ही आशा बनून,..
तू येणार नाहीस माहीत असून..
मी तुला जपून ठेवतो,
अळूच्या पानावरल्या थेंबासारखं..
एकांती बसलो असता..
तुझेच श्वास शोधत राहतो..
हिरव्या चाफ्यात,
तुझ्या केसांना हुंगत राहतो,
माझ्या अंगावरल्या शहार्यांत,
तुझच अस्तित्त्व शोधत राहतो..
हे शोध घेणं कधी संपणारच नाहीये का??
का अशी आलीस माझ्या आयुष्यात??
अवेळी बरसून जाऊन..
धरित्रीची काहिली करणार्या पाऊसधारांसारखी..
माझ्या काळजाला तीळतीळ तोडून..
प्रत्येक तुकड्या तुकड्यात..
तुझं प्रतिबिंब पाहतो..
अन् मग...
रक्ताळलेल्या हातांनी,
तुझ्या आठवणी धरून बसतो..
भंगलेल्या हृदयाशी..
तरीही गर्दीत तुलाच शोधत राहतो,
काय माहीत..
कधी कळेल तुलाही,
भट्कतोय मी तुझ्याचसाठी..
तू केलेल्या जखमा भरण्यासाठी,...
येशीलही कदाचित..
स्वतःची ओळख शोधत राहतो,
तुला धुंडाळत राहतो,
कदाचित या गर्दीतला एक चेहरा तू असशील..
या गर्दीत सारेच अनोळखी..
जगरहाटीप्रमाणे वाहत जाणारे,
मी प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत राहतो..
तुला शोधताना..
तू यावं माझ्या आयुष्यात..
माझं अस्तित्व बनून,
या गर्दीत माझ्यासाठी कुणीतरी थांबेल..
ही आशा बनून,..
तू येणार नाहीस माहीत असून..
मी तुला जपून ठेवतो,
अळूच्या पानावरल्या थेंबासारखं..
एकांती बसलो असता..
तुझेच श्वास शोधत राहतो..
हिरव्या चाफ्यात,
तुझ्या केसांना हुंगत राहतो,
माझ्या अंगावरल्या शहार्यांत,
तुझच अस्तित्त्व शोधत राहतो..
हे शोध घेणं कधी संपणारच नाहीये का??
का अशी आलीस माझ्या आयुष्यात??
अवेळी बरसून जाऊन..
धरित्रीची काहिली करणार्या पाऊसधारांसारखी..
माझ्या काळजाला तीळतीळ तोडून..
प्रत्येक तुकड्या तुकड्यात..
तुझं प्रतिबिंब पाहतो..
अन् मग...
रक्ताळलेल्या हातांनी,
तुझ्या आठवणी धरून बसतो..
भंगलेल्या हृदयाशी..
तरीही गर्दीत तुलाच शोधत राहतो,
काय माहीत..
कधी कळेल तुलाही,
भट्कतोय मी तुझ्याचसाठी..
तू केलेल्या जखमा भरण्यासाठी,...
येशीलही कदाचित..