कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...
कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची,
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत..
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे,
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत..
अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही,
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत..
या 'स्वप्नवेड्याला' भुलावणहि काही सोप्पं नव्हतचं मुळी,
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत..
तुझं निरागस हसणं,
तुझं निरागस असणं,
हळूहळू मनात घर करत गेलं..
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला,
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत..
ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास,
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये..
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं,
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत..
कधी माझं "मी" पण गळालं नाही कळलं,
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं,
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो गं मी
शोना..
तुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.