तू अनोळखी, तरी ओळखीची.. असुनी दूर, का जवळची.... पाहिले न तुजला कधी माझी परी तू सावली.. ... शोधितो मीच मजला का देहात अशी सामावाली....
तू अनोळखी, तरी ओळखीची..
असुनी दूर, का जवळची....
पाहिले न तुजला कधी
माझी परी तू सावली..
... शोधितो मीच मजला
का देहात अशी सामावाली..
बोलणे लटके तुझे
का, कसे हटके असे
मोकळा होवुनी गुंततो मी
का, मन झाले वेडेपिसे...
सांग ना ग कोण तू
बहरले का ऋतू
गंध तू कुसुमातला
का कस्तुरी सुवास तू..
डोळ्यांतली आस तू
का खुळी प्रीत तू..
अनोळखी, का ओळखीची
गूढ सखे हे खोल तू....
असुनी दूर, का जवळची....
पाहिले न तुजला कधी
माझी परी तू सावली..
... शोधितो मीच मजला
का देहात अशी सामावाली..
बोलणे लटके तुझे
का, कसे हटके असे
मोकळा होवुनी गुंततो मी
का, मन झाले वेडेपिसे...
सांग ना ग कोण तू
बहरले का ऋतू
गंध तू कुसुमातला
का कस्तुरी सुवास तू..
डोळ्यांतली आस तू
का खुळी प्रीत तू..
अनोळखी, का ओळखीची
गूढ सखे हे खोल तू....